Rohit Pawar | आमदार रोहित पवारांची माणुसकी, स्वत:च्या गाडीनं अपघातग्रस्ताला पाठवलं रुग्णालयात

| Updated on: Oct 03, 2021 | 8:03 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी कमी कालावधीत आपल्या कार्यशैलीमुळे राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच रोहित पवार यांच्यातील माणुसकीचं दर्शन आज घडलं. रोहित पवार यांच्या संकल्पनेतील स्वराज्य ध्वज यात्रा आज पंढरपूर तालुक्यात दाखल झाली होती. ही स्वराज्य ध्वज यात्रा पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे परिसरात आली होती. त्यावेळी रस्त्यावर एक अपघात झाल्याची माहिती रोहित पवार यांना मिळाली. त्यावेळी रोहित पवार यांनी अपघातातील जखमींसाठी स्वत:च्या ताफ्यातील गाडी दिली आणि त्यांना रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली.

रोहित पवार स्वराज्य ध्वज यात्रेसोबत होते. ही यात्रा पंढरपूर तालुक्यातील गुरसाळेपर्यंत आली होती. त्यावेळी रस्त्यावर एक अपघात झाल्याची माहिती रोहित पवारांना मिळाली. एका परप्रांतिय मजुराचा अपघात झाल्याची माहिती मिळताच रोहित पवार यांनी स्वत:च्या गाडीतून जखमी तरुणाला उपचारासाठी पंढरपूरच्या विठाई रुग्णालयात पाठवलं. या युवकावरील उपचाराचा खर्चही रोहित पवार करणार आहेत, तशी माहिती रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. या घटनेतून रोहित पवार यांच्यातील माणुसकीचं दर्शन घडलं.

Devendra Fadnavis | जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा : देवेंद्र फडणवीस
Eknath Khadse | राष्ट्रवादीत आल्यानंतर भाजपमधील गद्दार लोकं कळाली