Satara | शशिकांत शिंदे पराभवानंतर कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्याच कार्यालयावर दगडफेक

| Updated on: Nov 23, 2021 | 11:29 AM

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. या धक्कादायक पराभवामुळे शिंदे समर्थक प्रचंड संतापले आहेत. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदे यांचा पराभव झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट पक्ष कार्यालयावरच हल्ला चढवला आहे. शिंदे समर्थकांना पक्ष कार्यालयावर दगडफेक करत राग व्यक्त केला असून त्यामुळे परिसरातील वातावरण तापलेलं आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यापंचवार्षिक निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागले आहेत. जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला, तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. शिंदे यांना 24 तर रांजणे यांना 25 मते मिळाली. या धक्कादायक पराभवामुळे शिंदे समर्थक प्रचंड संतापले आहेत. स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदेंना हा पराभव स्वीकारावा लागल्याचा आरोप करत शिंदे समर्थकांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच दगडफेक सुरू केली. त्यामुळे वातावरण अधिकच तापले होते. कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयाभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

Pune | अंगारकी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिराला आकर्षक फुलांची सजावट
शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात, दुचाकीस्वार येऊन धडकले