Supriya Sule यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर हल्लाबोल; म्हणाल्या, ‘… भाजपनं माफी मागावी’

| Updated on: Sep 25, 2023 | 4:14 PM

VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या त्या कथित व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपवर भाष्य करत सडकून टीका, 'भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा...'

मुंबई, २५ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या त्या कथित व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपवर भाष्य करत टीका केली आहे. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात, ही अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तर पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. ज्याअर्थी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी खोचक टोलाही लगावला आगे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपला आव्हानच दिले आहे.

Published on: Sep 25, 2023 04:14 PM
Ganesh Chaturthi 2023 | राज ठाकरे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्…
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…