Womens Reservation Bill | सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना टोला; म्हणाल्या, ‘असा भाऊ प्रत्येक घरात नसतो’

| Updated on: Sep 20, 2023 | 6:19 PM

VIDEO | लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं महिला आरक्षण विधेयकावर भाष्य अन् राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला टोला, बघा व्हिडीओ काय केलं वक्तव्य?

नवी दिल्ली, २० सप्टेंबर २०२३ | नवी दिल्ली येथे लोकसभेत बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला आरक्षण विधेयकावर भाष्य केले आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देखील दर्शविला. दरम्यान, लोकसभेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी महिला आरक्षण विधेयकावर बोलताना असे म्हटले की, महिलांच्या भल्यासाठी फक्त महिलांनी बोलावं, असे नाही तर पुरूषदेखील या विषयी बोलू शकतात. आम्ही भाऊ म्हणून बोलू शकतो. याचाच उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. ‘प्रत्येक घरात असे भाऊ असतातच असे नाही की जे बहिणीचं कल्याण करतील आणि प्रत्येकाचं नशीब एवढं चांगलही नसतं’, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी खोचक टोला लगावत निशाणाही साधला. तर लोकसभेत दोन दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी माझे ८०० भाऊ असल्याचेही वक्तव्य केले होते. यावरून देखील चर्चांना उधाण आले होते.

Published on: Sep 20, 2023 06:19 PM
Rohit Pawar यांनी विचार करून बोलावं, भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा; बघा काय केलं वक्तव्य?
Ganesh Chaturthi 2023 | सिद्धिविनायक पावला, भक्ताने हिरेजडीत सोन्याचा मुकुट दान केला