बिग बॉस विजेत्याचं सुप्रिया सुळेंकडून कौतुक; म्हणाल्या, ‘सूरज आम्हाला तुझा अभिमान, हृदयात जागा…’

| Updated on: Oct 07, 2024 | 12:04 PM

70 दिवसांच्या बिग बॉस मराठीच्या पाचवा सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे तीन जण अंतिम फेरीपर्यंत धडकले होते. मात्र या तिघांपैकी सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझनचा विजेता ठरला

बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पाचव्या सीझनचा सूरज चव्हाण हा विजेता ठरला आहे. बिग बॉस मराठी या कार्यक्रमात सूरज चव्हाणचा गुलीगत पॅटर्न चांगलाच गाजल्याचे पाहायला मिळाले तर गायक अभिजीत सावंत हा बिग बॉस मराठी पाचव्या सीझनचा उपविजेता ठरला आहे. सूरज चव्हाण हा विजेता ठरल्यानंतर सर्वच क्षेत्रातील लोक त्यांच्या परिश्रमाचे कौतुक करताना दिसताय. अशातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करून सूरज चव्हाणचं अभिनंदन केल्याचे पाहायला मिळाले. ‘‘बिग बॉस’ या रियॅलिटी शो मध्ये आपल्या बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला’, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सूरज चव्हाणला अभिनंदन करणारं ट्वीट केलं. तर पुढे त्या असंही म्हणाल्या, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो.

Published on: Oct 07, 2024 12:04 PM
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा ‘प्रहार’, बच्चू कडूंना मोठा धक्का
अब्दुल सत्तारांच्या साडी वाटपावरून रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल, ‘बायका आमच्या अन् साड्या त्याच्या?’