देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांचा सहारा, नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

| Updated on: Feb 14, 2023 | 3:11 PM

VIDEO | देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारी सहाच्या सहा खाती फेल, सुप्रिया सुळे यांचा आरोप

परभणी : शरद पवार हे कोणतेच काम लपून छपून करणार नाही असे वक्तव्य करत अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांचे समर्थन केले आहे. देवेंद्र फडणवीस स्वतःच्या राजकारणासाठी आणि त्यांच्या बातम्या होत नाही म्हणून ते शरद पवार यांचा सहारा घेत असतात, अशी शक्यता खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. इतर पक्षात देवेंद्र फडणवीस यांना जागा कोणी देत नसतील, त्यामुळे ते शरद पवार यांचे नाव घेत असतात, अशी खोचक टीकाही सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. तर राज्याची सहा खाती त्यांच्याकडे असून ती सर्व खाती फेल गेल्याचा गंभीर आरोपही सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे. यासह त्यांनी राज्याची चिंता वाटत असल्याची खंतही अखेरीस व्यक्त केली. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे बघा…

Published on: Feb 14, 2023 03:11 PM
अमित शाह शिवनेरी किल्ल्यावर जाणार, शिवजयंती सोहळ्याला लावणार हजेरी
देवेंद्र फडणवीस लावालाव्या करण्यात एक्सपर्ट झालेत; ठाकरे गटाच्या नेत्याची घणाघाती टीका