सुप्रिया सुळे यांनी केलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक, काय म्हणाल्या बघा व्हिडीओ

| Updated on: Feb 23, 2023 | 3:08 PM

VIDEO | हे कदाचित दिल्लीच्या तख्ताला सहन होत नसेल, केंद्र सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा, बघा काय केला आरोप

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याने आता अधिकृतपणे शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा झाला. गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेना कोणाची हा प्रश्न अनुत्तरित होता, तो प्रश्न आता सुटला आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात भाष्य केले. यावेळी त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडत राज ठाकरे यांनी मनसे हा पक्ष स्थापन केल्याचे कौतुक केले. तर त्या असेही म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल हे ठरवले होते. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मी मनापासून कौतूक करेल. त्यांनी शिवसेना फोडली नाही. एका मराठी माणसाने काढलेला पक्ष हा दुसऱ्या मराठी माणसाकडे जात आहे. दिल्लीकरांचा मराठी अस्मिता, मराठी भाषा मोडून शिवसेना संपवण्याचा कट आहे. महाराष्ट्राच्या विरोधात आणि मराठी माणसांच्या विरोधात हे केंद्र सरकार काम करतेय, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

Published on: Feb 23, 2023 03:08 PM
पिक्चर लागून सात महिने झाले, तरी तेच तुनतुनं वाजवताहेत, आता बोअर झालंय; शिंदेगटातील मंत्र्याचं आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र
रोहित पवार बिनडोक माणूस, भाजप आमदारानं केला रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल