Supriya Sule Video : ‘…हा सरकारचा खोटानाटा खेळ’, जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचा घणाघात
3 कोटी हा मोठा आकडा आहे. त्यात 1 कोटी दिले कशासाठी? या महिलेकडे असं काय आहे की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. यानंतर सुप्रिया सुळेंनी देखील शंका व्यक्त केली आहे.
जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली असून तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. तर हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप या महिलेवर करण्यात येतोय. अशातच नोटबंदी केली असताना 1 कोटींची कॅश आली कुठून?, असा सवाल शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाहीतर नक्की महिलेने पैसे मागितले का? की हा सरकारचा खोटानाटा खेळ आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हणत सरकारवरच निशाणा साधलाय. ‘1 कोटींची कॅश देणाऱ्याकडे आली कुठून? या देशाने आणि याच डबल इंजिन सरकारने नोटबंदी केली तर 1 कोटी रूपयांची कॅश आली कुठून? हाच मोठा प्रश्न आहे’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुढे त्या असेही म्हणाल्या, नक्की महिलेने ते 1 कोटी रूपये पैसे मागितले का? की हा सरकारचा खोटानाटा खेळ आहे, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शंका उपस्थित केली आहे. तर सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.