Special Parliament Session | सुप्रिया सुळे यांनी भाजपला धारेवर धरलं; म्हणाल्या, ”मोदी यांनी लावलेल्या ‘त्या’ आरोपांची…”

| Updated on: Sep 18, 2023 | 6:06 PM

VIDEO | संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला चांगलंच घेरल, बघा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२३ | संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर घोटाळ्यांचे आरोप होते. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुम्ही भ्रष्टाचाराची चौकशी करा, आम्ही तुम्हाला समर्थन देऊ… पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते, तेव्हा त्यांनी एनसीपीचा नेचरली करप्ट पार्टी असा उल्लेख केला होता. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीवर लावलेल्या घोटाळ्यांची चौकशी करावी, असे थेट आव्हानच भाजपला दिले आहेत. बघा व्हिडीओ संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणल्या…

Published on: Sep 18, 2023 06:06 PM
‘मंगळसूत्र चोर अशी गोपीचंद पडळकर यांची ओळख’, राष्ट्रवादीच्या आमदाराची सडकून टीका
‘माझे 800 भाऊ, एक… मोदी त्या आरोपांचे काय झाले?’, ससंदेत सुप्रिया सुळे कडाडल्या