Pune | पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत 2 कोटींच्या रामाच्या मूर्तीचा ठराव, राष्ट्रवादीचा विरोध
स्थायी समितीने अति तातडीने हा ठराव मान्य केला आहे. मात्र रामाची मूर्ती खेळाच्या मैदानावर ती उभारले कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होतोय.
पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीत दोन कोटी रुपयांची रामाची मूर्ती क्रीडांगणात लावण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय. धनकवडीच्या आंबेगाव पठार भागातील भाजप नगरसेविका वर्षा तापकीर यांनी हा ठराव दिला आहे. स्थायी समितीने अति तातडीने हा ठराव मान्य केला आहे. मात्र रामाची मूर्ती खेळाच्या मैदानावर ती उभारले कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होतोय. राष्ट्रवादी काँग्रेससह पुण्यातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष या ठरावाला विरोध करतात.