NCP : राष्ट्रवादी नेमकी कुणाची? थोड्याच वेळात निवडणूक आयोगात सुनावणी, कोण-कोण उपस्थित?
राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह नेमकं कुणाचं याबाबत थोड्याच वेळात सुनावणी. त्यामुळे आजचा दिवस हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचा. यापूर्वी तीनदा यासंदर्भात सुनावणी झाली होती. तर गेल्या दहा दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळी निवडणूक आयोगाने सलग सुनावणी होईल असे सांगितले, त्यानुसार आज सुनावणी
नवी दिल्ली, २० नोव्हेंबर २०२३ : राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह नेमकं कुणाचं याबाबत थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचा आहे. गेल्या वेळी झालेल्या सुनावणीदरम्यान, शरद पवार यांच्या गटाकडून युक्तिवादावेळी अजित पवार गटावर बोगस प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आरोप करण्यात आला होता. तर अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असल्याने आज शरद पवार गटाकडून युक्तिवाद होणार आहे. या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे. निवडणूक आयोगात आज चौथ्यावेळी ही सुनावणी होणार आहे. यापूर्वी तीनदा यासंदर्भात सुनावणी झाली होती. तर गेल्या दहा दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळी निवडणूक आयोगाने सलग सुनावणी होईल असे सांगितले होते. त्यानुसार आता ही सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाकडून स्वतः शरद पवार उपस्थित आहेत. तर अजित पवार गटाकडून पार्थ पवार, सुनील तटकरे, रूपाली चाकणकर आणि सूरज चव्हाण आयोगात उपस्थित आहेत.