शरद पवार कृषीमंत्री असताना संसदेत काय घडलं? भरसभेत सांगितला ‘तो’ किस्सा, बघा व्हिडीओ

| Updated on: Mar 10, 2023 | 3:25 PM

VIDEO | मी स्वतःच सांगितलं होतं माझा निषेध करा, शरद पवार यांनी सांगितलेला नेमका किस्सा कोणता? बघा काय म्हणाले

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषिमंत्री असतानाचा एक किस्सा भर भाषणात सांगितला. अहमदनगर येथे एका कार्यक्रमात बोलत असतांना कांद्याच्या बाबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर मिळत नसल्याने शेतकरी वर्गात मोठी नाराजी पसरली आहे. त्याचेच पडसाद राज्यात सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील पाहायला मिळाले. यासर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ते संसदेत कृषीमंत्री असतानाचा एक किस्सा शेअर केला. शरद पवार कृषीमंत्री असताना भाजपच्या काही खासदारांनी संसदेमध्ये कांद्याच्या माळा घालून येत कांद्याचे भाव कमी करा म्हणून मागणी केली होती. संसदेत हा प्रश्न मांडला होता त्यावर अध्यक्षांनी संसद भावनाला हे उत्तर द्या म्हणून सांगितले होते. त्यावर मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती, तुम्ही माझ्या विरोधात निषेध करा, आंदोलन करा, पण तरीही मी कांद्याचे दर कमी करणार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती.

Published on: Mar 10, 2023 03:25 PM
4 Minutes 24 Headlines | खतासाठी जात विचारणे महाराष्ट्रात चालू देणार नाही : मविआ
गोखले पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक, कोणत्या वेळात असणार लोकल रद्द?