Sharad Pawar | राज्यातला प्रत्येक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतात : शरद पवार
एसटी कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवावा, असं आवाहन शरद पवार यांनी केलंय. मात्र, कोणत्या अधिकारातून शरद पवार यांनी ही बैठक घेतली? मुख्यमंत्रीपदाचा कारभार पवारांकडे देण्यात आलाय का? असा खोचक सवाल भाजप नेत्यांकडून केला जातोय. भाजप नेत्यांच्या या प्रश्नाला आता खुद्द शरद पवार यांनीच जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई : मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Workers Strike) तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल एसटी संघटनांसोबत बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवावा, असं आवाहन शरद पवार यांनी केलंय. मात्र, कोणत्या अधिकारातून शरद पवार यांनी ही बैठक घेतली? मुख्यमंत्रीपदाचा कारभार पवारांकडे देण्यात आलाय का? असा खोचक सवाल भाजप नेत्यांकडून केला जातोय. भाजप नेत्यांच्या या प्रश्नाला आता खुद्द शरद पवार यांनीच जोरदार प्रत्युत्तर दिलंय.