Sharad Pawar | एस.टी. कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण, पगारवाढीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar | एस.टी. कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण, पगारवाढीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jan 10, 2022 | 7:11 PM

एसटी पूर्वपदावर आणा, मागण्या मान्य होतील. राज्य सरकारच्या वतीने मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलीय, त्याचा विचार करावा. विलीनीकरण अजूनही सरकारने शक्य नसल्याचे म्हटलंय. विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे.. त्यावर अधिक बोलायला नकोय, असे शरद पवार म्हणाले.

मुंबई : पहिल्यांदाच मी असं बघितलंय की दोन महिने संप सुरु आहे. कामगारांचं हित जपण्यासाठी जे लोक वेळ देतात, त्यांचचं ऐकणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. गेल्या 30 ते 40 वर्षात मी पाहिलंय. कामगारांचा दृष्टिकोन प्रवाशांच्या सेवेचाच असतो, मागण्या असतात पण त्या तेवढ्या पुरतं. मला इथे राजकारण करायचं नाही. मला हा प्रश्न सोडवायचा आहे. कोणत्या राजकीय पक्षाने त्यांना घ्यायची आहे ती भूमिका घ्यावी. मी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. आज परिवहन मंत्री आणि सगळ्यांशी चर्चा झालीय. महाराष्ट्रातील प्रवासी वर्ग अत्यंत महत्वाचा आहे. प्रवाशांच्या स्थितीचं वर्णन न केलेलं बरं. त्यात कोरोनाचा नवा अवतार समोर आलाय. आज महाराष्ट्राच्या अर्थकारणावर मोठा परिणाम सुरू असल्याचेही पवार म्हणाले. एसटी पूर्वपदावर आणा, मागण्या मान्य होतील. राज्य सरकारच्या वतीने मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलीय, त्याचा विचार करावा. विलीनीकरण अजूनही सरकारने शक्य नसल्याचे म्हटलंय. विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे.. त्यावर अधिक बोलायला नकोय, असे शरद पवार म्हणाले.

Anil Parab | सातवे वेतन आयोग लागू होणार? अनिल परब म्हणतात…
‘गुजरले ते गुजरले’; Ajay Gujar यांच्यावर Gunaratna Sadavarte यांची मोजक्या शब्दात टीका