राष्ट्रवादीचं पुण्यात गॅस दरवाढीविरोधात आंदोलन, मुंबईत मनसेकडून मंदिरं उघडण्यासाठी आरती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुण्यात गॅस दरवाढी विरोधात आक्रमक आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकरणकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुण्यात गॅस दरवाढी विरोधात आक्रमक आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकरणकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं आहे. महागाईविरोधात आणि केंद्रातील मोदी सरकार विरोधात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे. राष्ट्रवादी महिला आघाडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्टानं गोवऱ्या पाठवल्या जाणार आहेत. दुसरीकडं मंदिर उघडण्याबाबतची भूमिका राज ठाकरेंनी जाहीर केल्यानंतर मनसे देखील मंदिर उघडण्यासाठी आक्रमक झालेली पाहायला मिळाली. मुंबईत मनसेच्यावतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं. मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना 25 कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.