‘असा जनतेचा कौल होता आणि तो आम्ही मान्य केला’, कसब्यातील पराभवावर काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे

| Updated on: Mar 04, 2023 | 2:58 PM

VIDEO | देशभर महाविकास आघाडीची लाट? कसब्यातील पराभवावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात?

मुंबई : कसबा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा दारूण पराभव झाला तर काँग्रेसचे उमेदवार हेमंत धंगेकर यांचा विजय झाला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याची चर्चा होतेय. तर कसब्याच्या पोट निवडणुकीत निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव अवघ्या महाराष्ट्रात चर्चिला जात आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कसब्यातील पराभवावर आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. कसब्यात एक सुप्त लाट होती. कसब्यात प्रचारासाठी फिरताना मलाही ती जाणवली, रविंद्र धंगेकर यांनी दोनदा निवडणूक लढल्यामुळे त्यांनाच यावेळी मत द्यावं, असा जनतेचा कौल होता आणि तो आम्ही मान्य केला. यातून पूर्ण महाराष्ट्राचं चित्र दिसतंय, हे म्हणणं चुकीचं असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 04, 2023 02:58 PM
‘चिल्लर लोकांवर मला बोलायला आवडत नाही’, संदीप देशपांडे यांच्यावर कुणाची खोचक टीका
संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही अन् तोंडाला लगाम नाही; भाजप नेत्याचा हल्लाबोल