‘स्वाभिमान गहाण टाकला की…’, रोहित पवार यांचा शिंदे अन् अजित पवार गटाला खोचक टोला

| Updated on: Mar 13, 2024 | 1:09 PM

'हरियाणामध्ये दोन जागांचा आग्रह करणाऱ्या 'मित्राला' भाजपने शिकवलेला धडा हा महाराष्ट्रातल्या मित्रांसाठी संदेश तर आहेच शिवाय अल्टिमेटम देखील आहे.', रोहित पवार यांनी शिंदे आणि अजित पवार गटाला खोचक टोला लगावला आहे.

मुंबई, १३ मार्च २०२४ : हरियाणामध्ये भाजपने शिकवलेला धडा राज्यातील मित्रांसाठी संदेश, असं म्हणत रोहित पवार यांनी शिंदे आणि अजित पवार गटाला खोचक टोला लगावला आहे. ‘हरियाणामध्ये दोन जागांचा आग्रह करणाऱ्या ‘मित्राला’ भाजपने शिकवलेला धडा हा महाराष्ट्रातल्या मित्रांसाठी संदेश तर आहेच शिवाय अल्टिमेटम देखील आहे. हरियाणातील राजकीय घडामोड बघता विकासाच्या आणि विचारधारेच्या नावाखाली भाजपसोबत जाणाऱ्या महाराष्ट्रातील मित्रपक्षांच्या नेत्यांना ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’ याचा प्रत्यय आलाच असेल’, असं रोहित पवार यांनी ट्वीटद्वारे म्हटलंय तर उद्या लोकसभेसाठी राज्यात सर्वच मित्रपक्षांना कमळाच्या चिन्हावर लढावे लागले तर आश्चर्य वाटू नये. असो स्वतःच्या अडचणींमुळे नेते हतबल असले तरी तिकडे गेलेले आमदार मात्र हतबल नाहीत, ते नक्कीच योग्य तो बोध घेऊन सुयोग्य तो निर्णय लवकरच घेतील, रोहित पवार यांनी शिंदे आणि अजित पवार गटाला उद्धेशून खोचक टि्वट केलंय.

Published on: Mar 13, 2024 01:09 PM
बाप्पाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, दादरच्या सिद्धीविनायक मंदिराचा होणार कायापालट, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
वसंत मोरे यांना रात्री संजय राऊत यांचा फोन, काय झाली दोघांत चर्चा?