गोविंदबागेत दिवाळी पाडवा पण अजितदादा फिरकले नाहीत, अखेर अजित पवार यांच्याकडून सस्पेन्स दूर
दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने पवार कुटुंबीय गोविंदबागेत एकत्र येऊन भेटीगाठी घेतात. यंदाही पवार कुटुंबीय गोविंदबागेत एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. मात्र यावेळी अजित पवार दिसत नसल्याने चर्चा सुरू होत्या. मात्र रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे गोविंदबागेत आलेत अन् सस्पेन्स केला दूर
मुंबई, १५ नोव्हेंबर २०२३ | गोविंदबागेतील दिवाळी पाडवा म्हणजे पवार कुटुंबियांचा आनंदाचा सोहळा. या सोहळ्यासाठी राज्यभरातील पवार समर्थक बारामतीमध्ये आलेत. पण दिवसभर अजित पवार तेथे काही फिरकले नाहीत. मात्र अजित पवार यांनी सर्व सस्पेन्स दूर केला. अजित पवार यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे. सध्याचं राजकीय चित्र आणि हालचाली पाहता, सर्वसामान्य माणसाच्या मनात हा प्रश्न निर्माण होतोय. कारण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा होताय. तर दुसरीकडे पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येईल अशी चर्चाही राष्ट्रवादीच्या गोटात रंगतेय. असं असलं तरी गोविंदबागेत उत्साहात दिवाळी पाडवा साजरा झाला. गेल्या ५३ वर्षांपासून दिवाळी पाडव्यानिमित्त शरद पवार राज्यातील कार्यकर्त्यांना भेटतात. यंदाही ते कार्यकर्त्यांना भेटले त्यांची विचारपूसही केली. सर्वत्र कार्यकर्त्यांची गर्दी दिसत असली तरी गोविंदबागेत अजित पवार यांची उणीव मात्र जाणवली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट