अजित पवार यांचं ‘त्या’ व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर स्पष्टीकरण, अजितदादा म्हणताय, ‘तो मी नव्हेच…’
VIDEO | शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार एका गाडीत बसून निघून गेले आणि हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. याच व्हिडीओवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. म्हणाले, शरद पवार यांना भेटलो पण....
मुंबई, १५ ऑगस्ट २०२३ | पुण्यामध्ये व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांच्या घरी भेट झाली. या भेटीनंतर अजित पवार एका गाडीत बसून निघून गेले आणि हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. याच व्हिडीओवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘त्या’ गाडीत मी नव्हतोच! असं अजित पवार यांनी म्हटलंय. अतुल चोरडिया यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर सर्वात पहिल्यांदा बाहेर पडली ती अजित पवार यांची गाडी…गेट बाहेर गाडी पडल्यानंतर चालकानं गाडीचा वेग कमी केला. तर गाडीत कोणी नाही हे दाखवण्यासाठी काचाही खाली केल्यात आणि खरंच त्या गाडीत अजितदादा नव्हतेच. तर चोरडिया यांच्या गाडीत अजित पवार बाहेर पडताना झोपून गेल्याचे पाहायला मिळाले. आणि हाच व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. बेधडक, सडेतोड आणि बिनधास्त बोलणारे अजित पवार झोपून का गेलेत? असा प्रश्न सर्वांचा पडला. यावरून राज ठाकरे यांनी टोला मारला बघा काय म्हणाले राज ठाकरे…