ठाकरे-पवार भेटीत नेमकं काय घडलं? संजय राऊतांचा ‘रोखठोक’मधून मोठा गौप्यस्फोट
VIDEO | महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, उद्धव ठाकरे आणि शरद पावर यांच्या 'त्या' भेटीत नेमकं काय घडलं?
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज त्यांच्या ‘सामना’ रोखठोकमधून महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर रोखठोकपणे भाष्य केलं आहे. तर संजय राऊत यांनी त्यांच्या ‘रोखठोक’ सदरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकीतील माहिती उघड केल्याने खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची चार दिवसांपूर्वी महत्त्वाची बैठक पार पडली होती. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानीच ही बैठक पार पडली होती. या बैठकीत नेमकी काय माहिती समोर येईल, अशी अनेकांना उत्सुकता होती. अखेर या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबद्दल स्वत: संजय राऊत यांनी खुलासा केला आहे. विशेष म्हणजे या बैठकीत संजय राऊत हे देखील उपस्थित होते. दरम्यान, संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून खुलासा करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. बघा काय म्हणाले संजय राऊत….