अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, … तेव्हा चूक झाली, आता यापुढं होणार नाही
२०१९ ला नवनीत राणा अपक्ष लढल्या, आघाडीत अमरावतीची जागा राष्ट्रवादीला सुटली होती आणि शरद पवारांनी येथे उमेदवार न देता या ठिकाणी नवनीत राणांना पाठिंबा दिला होता. मात्र विजयानंतर नवनीत राणांचा कल भाजपच्या बाजूने गेला आणि आता...
अमरावतीमध्ये काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांच्यासाठी ठाकरे आणि शरद पवारांनी सभा घेतली. यावेळी शरद पवारांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. २०१९ मध्ये जागा सोडून नवनीत राणा यांना खासदार करून चूक झाली, आता पुन्हा अशी चूक करणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. राणांवर हल्लाबोल करत शरद पवारांनी बळवंत वानखेडेंना मतदान करा, असं आवाहन केलं. २०१९ ला नवनीत राणा अपक्ष लढल्या, आघाडीत अमरावतीची जागा राष्ट्रवादीला सुटली होती आणि शरद पवारांनी येथे उमेदवार न देता या ठिकाणी नवनीत राणांना पाठिंबा दिला होता. मात्र विजयानंतर नवनीत राणांचा कल भाजपच्या बाजूने गेला आणि आता तर त्या भाजपच्याच उमेदवार आहेत. त्यामुळे या शरद पवारांनी अमरावतीकरांना चूक सुधारण्याचं आवाहन केलंय. बघा स्पेशल रिपोर्ट काय म्हणाले शरद पवार?
Published on: Apr 23, 2024 11:07 AM