Sharad Pawar : ‘राज्यात जे काही चाललंय ते…’, महायुतीच्या रखडलेल्या शपथविधीवरून शरद पवारांचा हल्लाबोल

| Updated on: Nov 30, 2024 | 12:58 PM

भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्याने भाजपचा अर्थात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हे दिल्लीतील बैठकीनंतर ठरलं असलं तरी मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. तर येत्या ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होईल अशी माहिती आहे.

गेल्या २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा लागला. या निवडणुकीत महायुतीसह भाजपला बंपर यश मिळालं तर महाविकास आघाडीला मोजक्या जागांवरच समाधान मानावं लागलं. निकालानंतर भाजप महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार यात काही शंका नाही. दरम्यान, भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्याने भाजपचा अर्थात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हे दिल्लीतील बैठकीनंतर ठरलं असलं तरी मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. तर येत्या ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होईल अशी माहिती आहे. मुंबईतील आझाद मैदानावर ५ डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता असताना महायुतीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतरही रखडलेल्या शपथविधीवरून शरद पवारांनी महायुतीवरच हल्लाबोल केला आहे. स्पष्ट बहुमत असतानाही सरकार स्थापन होत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. इतकंच नाहीतर सध्या राज्यात जे काही सुरू आहे ते राज्याला अशोभनीय असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. लोकांचं मत महत्त्वाचं नाही हे स्पष्ट होतंय, असं म्हणत शरद पवार यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. बघा नेमकं काय म्हणाले शरद पवार?

Published on: Nov 30, 2024 12:58 PM