Sharad Pawar : शरद पवार यांच्या भाषणात गौतमी पाटील हिचा उल्लेख, नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Oct 11, 2023 | 4:44 PM

VIDEO | सरकारी शाळा खासगी कंपन्यांना चालवण्यासाठी देण्याच्या सरकारच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. प्रसिद्ध नृत्यंगणा गौतमी पाटील संदर्भात शरद पवार यांनी काय केल भाष्य, बघा व्हिडीओ आपल्या भाषणात काय म्हणाले शरद पवार?

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | सरकारी शाळा खासगी कंपन्यांना चालवण्यासाठी देण्याच्या सरकारच्या निर्णयावर शरद पवार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. शाळा दत्तक घेतल्या जात आहेत. शाळेचा वापर खासगी कारणासाठी होईल. यामध्ये मनमानी पद्धतीने काम करण्याचे प्रकार वाढणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. तर नाशिकच्या एका शाळेचं उदाहरण यावेळी शरद पवार यांनी दिलं. शरद पवार म्हणाले, ‘मद्य निर्मिती करणाऱ्या एका कंपनीने दत्तक घेतलेल्या शाळेत गौतमी पाटील हिच्या डान्सचा कार्यक्रम ठेवला. शाळेतील विद्यार्थ्यांसमोर आपण असे आदर्श ठेवणार आहोत का?’, असा सवालही शरद पवार यांनी केला. ते पुढे असेही म्हणाले की, असे प्रकार घडत असल्याने आपण सरकारी शाळा खासगी कंपन्यांना चालवण्यासाठी देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध केला पाहिजे. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा होत आहे. यामध्ये शरद पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली

Published on: Oct 11, 2023 04:44 PM
Sanjay Raut यांच्या गळ्यात शरद पवारांचा पट्टा की उद्धव ठाकरे यांचा?, कुणी केला थेट सवाल?
Cabinet Expansion : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्रीपद येणार, शिवसेना आमदाराचा दावा