NCP कोणाच्या ताब्यात जणार? निवडणूक आयोग करणार फैसला, त्याआधीच पवार काका- पुतण्यामध्ये टशन
tv9 Special Report | पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते मात्र ऐनवेळी अजित पवार यांनी बैठकीला हजर राहणं टाळलं, काय कारण?
मुंबई, १६ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादी कोणाच्या ताब्यात जाणार, याचा फैसला निवडणूक आयोग करणार आहे. मात्र आयोगात सुनावणीआधीच पवार काका- पुतण्यामध्ये टशन पाहायला मिळतंय. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या बैठकीला शरद पवार आले. मात्र ऐनवेळी अजित दादांनी ऐणं टाळलं. तसंच वळसे पाटलांनाही शरद पवार यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या बैठकीला शरद पवारांसह अजित पवारही हजर राहणार होते. मात्र त्यांनी येणं टाळलं आणि त्यावरुन उलट-सुलट चर्चा सुरु झाल्यात. मात्र, दादांच्याच गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील मात्र हजर राहिले. ऐवढंच नाही तर शरद पवारांना रिसिव्ह करण्यासाठी ते त्यांच्या गाडीपर्यंत आले. पवार गाडीतून उतरले. वळसे पाटलांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र पवारांनी त्यांच्याशी बोलणं टाळलं आणि पुढे चला असे हातवारे करत शरद पवार वसंत दादा शुगर इन्स्टिट्युटच्या आत गेले. राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटाच्या संघर्षाची झलक पुण्यात दिसलीच आणि म्हणूनच की काय, अजित पवारांनीही ऐनवेळी येणं टाळलं.