विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना दिलासा, निवडणूक आयोगानं घेतला मोठा निर्णय
निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह गोठावल्याचे समोर आले आहे. तर तुतारी वाजवणारा माणूस हे शरद पवार गटाचं निवडणूक चिन्ह कायम ठेवण्यात आलं आहे. यासोबत फक्त तुतारी हे निवडणूक चिन्ह देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठावलं आहे . बघा यासंदर्भातील व्हिडीओ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरदचंद्र पवार गटाला मोठा दिलासा देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह गोठावल्याचे समोर आले आहे. तर तुतारी वाजवणारा माणूस हे शरद पवार गटाचं निवडणूक चिन्ह कायम ठेवण्यात आलं आहे. यासोबत फक्त तुतारी हे निवडणूक चिन्ह देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठावलं आहे. यासदंर्भात शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत शरदचंद्र पवार गटाला मोठा दिलासा दिला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत तुतारी या चिन्हामुळे शरदचंद्र पवार गटाला मोठा फटका बसला होता, असा आरोप काही नेत्यांनी केला होता. या आरोपानंतर तुतारी सारखी दिसणारी निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गोठावण्यात आली आहे. बघा यासंदर्भातील व्हिडीओ…
Published on: Jul 19, 2024 05:51 PM