Sharad Pawar : पुण्यातून शरद पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?

| Updated on: Dec 22, 2024 | 2:06 PM

. गेल्या 20 डिसेंबरपासून सुरू झालेली भीमथडी जत्रा 25 डिसेंबरपर्यंत पुण्यातील सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू आहे. मात्र या भीमथडी जत्रेतून शरद पवारांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे पाहायला मिळाले

पुण्यात भरलेल्या भीमथडी जत्रेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट देत तेथे उपस्थिती दर्शविली. यावेळी शरद पवारांनी भीमथडी जत्रेतील अनेक स्टॉलवर हजेरी लावत तेथील विक्रेत्यांशी संवाद साधत त्यांच्या उत्पादनाबद्दल माहिती जाणून घेतली. भीमथडी जत्रेची अनेक वर्षांची परंपरा असून महाराष्ट्राच्या अनेक गावांमधून, खेड्यातून लोक इथे एकत्र येतात. यासोबत पुणेकरांनी देखील मोठ्या प्रमाणावर भीमथडी जत्रेत गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 20 डिसेंबरपासून सुरू झालेली भीमथडी जत्रा 25 डिसेंबरपर्यंत पुण्यातील सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू आहे. मात्र या भीमथडी जत्रेतून शरद पवारांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे पाहायला मिळाले. या फोननंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना का फोन केला असेल? अशा चर्चा सुरू असताना भीमथडी जत्रेत येण्याचे निमंत्रण शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र देवेंद्र फडणवीस येणार का याची देखील उत्सुकता लागली आहे.

Published on: Dec 22, 2024 02:06 PM