जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार रिंगणात, कुठे होणार राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत?
NCP Sharad Pawar Candidate 3rd List for Maharashtra Assembly Election 2024 : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून गटाकडून आज तिसरी आणि अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. बघा कोणाच्या नावाची केली घोषणा?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू झालाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसरी उमेदवारी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत 76 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने 45 तर दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पक्षातील काही उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादीतून एकूण 9 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. तिसऱ्या यादीतील उमेदवारांमध्ये बीडमधील परळी मतदारसंघात धनंजय मुडेंच्या विरोधात राजेसाहेब देशमुख, मुंबईतील अणुशक्तीनगरमधून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहद अहमद तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात शंकर जगताप विरूद्ध राहुल कलाटे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.