सी व्होटर सर्व्हेवर शरद पवार यांचे भाष्य; म्हणाले, बहुमताचा आकडा सत्ताधारी पक्षासोबत…
नुकताच सी व्होटरचा सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे. मात्र या सी व्होटरचा सर्व्हेने भाजप आणि शिंदे गटाची चिंता चांगलीच वाढवली आहे. कारण लोकसभेत महाविकास आघाडीला ३४ जागा तर भाजप आणि शिंदे गटाला १४ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशपातळीवर भाजपच्या जागा घटताना दिसत आहे. […]
नुकताच सी व्होटरचा सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे. मात्र या सी व्होटरचा सर्व्हेने भाजप आणि शिंदे गटाची चिंता चांगलीच वाढवली आहे. कारण लोकसभेत महाविकास आघाडीला ३४ जागा तर भाजप आणि शिंदे गटाला १४ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देशपातळीवर भाजपच्या जागा घटताना दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या गटात एकच खळबळ उडाली आहे. तर या सर्व्हेवर भाष्य करून भाजपचं टेन्शन देखील शरद पवारांनी वाढवल्याचे म्हटले जात आहे. बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांसोबत राहणार नाही, असे चित्र या सर्व्हेतून दिसतंय. तो सर्व्हे मी वाचला, आज जे सत्ताधारी आहेत, त्यांच्याविरोधात जनमत आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या हातात सत्ता राहिल असे मला वाटत नाही, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.