पण आपल्या सहकाऱ्यांना त्याची जाणीव नाही, दिलीप वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन शरद पवारांचा हल्लाबोल

| Updated on: Oct 31, 2024 | 5:01 PM

यंदाची निवडणूक महाराष्ट्रातील तीन महत्त्वाचे पक्ष, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांचं नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. या तिन्ही पक्षांनी एक आघाडी स्थापन केली. महाविकास आघाडी. या आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढत आहोत, असं शरद पवार म्हणाले.

Follow us on

महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज आंबेगाव-शिरूरमधील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या मतदारसंघातील आढावा बैठक पार पडली. यावेळी नाव न घेता शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. ‘पाच वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या तेव्हा राष्ट्रवादी एक होती. राज्यातील जनतेने ५३-५४ जागा दिल्या. आपण सरकार स्थापन केलं. त्या सरकारमध्ये पुणे जिल्ह्यातील दोन लोकांची निवड केली गेली. एक बारामतीचा प्रतिनिधी आणि दुसरा अंबेगावचा प्रतिनिधी. त्यांना वरच्या जागा दिल्या. मंत्रिमंडळाचा दर्जा दिला. तिसरी जागा इंदापुरात दिली. पुणे जिल्ह्याला यापूर्वी तीन जागा मिळाल्या नव्हत्या. पण त्या आपण दिल्या. ही संधी मिळाली. जिल्ह्याच्या हातात महत्त्वाची संधी आली. राज्याचे प्रश्न सोडवले पाहिजे. पुणे जिल्ह्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे’, असं शरद पवार म्हणाले. तर जिल्ह्याची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रातील काही जिल्हे उदा- वर्धा जिल्हा. वर्ध्यात तीन आमदार आहे. एका पुण्यात सहा आमदार आहेत. एवढा मोठा जिल्हा. या जिल्ह्यातील सामान्य लोकांच्या हिताची जपणूक करण्याची संधी आपल्या तीन मंत्र्यांना मिळाली होती. पण सत्ता आपण दिली. पक्षाने दिली. तेव्हा पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी तुम्ही कार्यकर्त्यांनी मेहनत केली. त्यातून यश आलं. या यशातून ते मंत्री झाले. सत्ता आली. पण आपल्या काही सहकाऱ्यांना त्याची जाणीव राहिली नाही, असे म्हणत शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल केला.