Sharad Pawar Group Candidate List : शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?

| Updated on: Oct 21, 2024 | 1:11 PM

येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २८८ मतदारसंघांसाठी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांकडून कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे याची तयारी सुरू आहे.

भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या 30 ते 40 जणांच्या उमेदवारीची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यासोबतच अजित पवार गटाची पहिली यादी आणि शरद पवार गटातील ३३ जणांची नावं निश्चित झाली असून त्यांची पण पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 33 नावं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तासगावातून आर.आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तर उद्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी आणि त्यासंदर्भात उद्या उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातील जे 33 नावं निश्चित झाले आहेत त्यापैकी इस्लामपूर-जयंत पाटील, कर्जत जामखेड- रोहित पवार, कळवा मुंब्रा – जितेंद्र आव्हाड, राहुरी- प्राजक्त तनपुरे, काटोल- अनिल देशमुख, घनसावंगी-राजेश टोपे, इंदापूर- हर्षवर्धन पाटील, मुक्ताईनगर-रोहिणी खडसे, कागल-समरजीत घाटगे, बारामती-युगेंद्र पवार, बीड-संदीप क्षीरसागर, पारनेर – राणी लंके यांचा समावेश आहे.

Published on: Oct 21, 2024 01:11 PM