Rohit Pawar : ‘मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या 25-30 कार्यकर्त्यांचा…’, रोहित पवार यांचा गंभीर आरोप

| Updated on: Nov 22, 2024 | 2:48 PM

भाजपच्या २५-३० कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करत भाजपवर गंभीर आरोप करत निशाणा साधला.

भाजपच्या २५-३० कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. तर माझे कार्यकर्ते आणि सीआरपीएफ जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळली. यावेळी पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याऐवजी त्रास दिला असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले. रोहित पवार यांनी ट्वीट करत भाजपवर गंभीर आरोप करत निशाणा साधला. ‘भाजपच्या सुमारे २५-३० कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु माझे कार्यकर्ते आणि CRPF च्या जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळत हा प्रयत्न हाणून पाडल्याबाबत त्यांचे आभार! याबाबत गुन्हा दाखल करताना भाजपच्या दबावाखाली असलेल्या स्थानिक पोलिस प्रशासनाने मात्र सहकार्य करण्याऐवजी त्रास देण्याचीच भूमिका घेतली, याची निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घ्यावी’, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. पुढे रोहित पवार यांनी असेही म्हटले की, भाजप कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भितीने सुरु असलेली गुंडागर्दी आहे. पण पुढील २४ तासातच कर्जत-जामखेडच्या जनतेकडून लोकशाही मार्गाने या गुंडगिरीला चाप बसल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त केला.

Published on: Nov 22, 2024 02:48 PM
‘… तर प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांचे घर फोडू’, कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; संजय राऊत म्हणाले, ‘ते उत्तम ड्रायव्हर अन् राज्यही…’