विद्या चव्हाणांनी ‘ती’ ऑडिओ क्लिप लावली अन् केले गंभीर आरोप, चित्रा वाघांचा पलटवार करत इशारा
विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघांवर आरोप केले. तर चित्रा वाघ यांनी देखील पत्रकार परिषद घेत जशाच तसं उत्तर चव्हाणांना देत थेट पलटवार केला. माझ्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या विद्या चव्हाण यांची प्रेस ऐकली. कालपासून चित्रा वाघ यांचे कारनामे महाराष्ट्राला सांगणार अशी सनसनाटी निर्माण केली.
सुनेला भडकवण्यासाठी आणि माझ्या बदनामीसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्हिडीओ तयार करण्यासाठी सांगितले, असा आरोप शरद पवार यांच्या गटातील नेत्या विद्या चव्हाण यांनी केला. इतकंच नाहीतर विद्या चव्हाण यांनी भर पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांची एक ऑडिओ क्लिपच ऐकवली. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून सून आणि मुलाच्या घटस्फोटाच्या प्रकणात नाक खुपसून मला बदनाम केल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला. तर सुनेला कशाप्रकारे व्हिडीओ तयार करायचे याचं षडयंत्र रचल्याचे सांगून सून, चित्रा वाघ आणि एका डॉक्टरांमधील संभाषणच चव्हाणांनी समोर आणलं. या आरोपानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला. होय आपणच विद्या चव्हाण यांच्या सुनेला गाईड केल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं.
Published on: Jul 31, 2024 11:19 AM