युगेंद्र पवार बारामती विधानसभा निवडणूक लढविणार? अजित दादांनी दिलेले संकेत खरे ठरणार?

| Updated on: Sep 09, 2024 | 6:07 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार हे उद्यापासून बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा काढणार आहेत. शरद पवार यांचे पुरोगामी विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी स्वाभिमान यात्रेचे आयोजन करत असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले, तर बारामतीच्या कण्हेरीच्या मारुतीला नारळ वाढून होणार स्वाभिमान यात्रेची सुरवात करणार असल्याची युगेंद्र पवार यांनी माहिती दिली

अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना रविवारी आपल्या मनातील खदखद भरसभेत बोलून दाखवली. ‘ मी आता ६५ वर्षांचा झालो आहे. मी समाधानी आहे. एकदा बारामतीकरांना कोणतरी मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीतील आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा’, असे अजित पवार म्हणाले. अजित दादांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार आता बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही, असे संकेत दिसताय. यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, अजित पवार यांच्यावर बोलण्यावर मी इतका मोठा नाही. जय पवार आणि युगेंद्र पवार अशी लढाई झाली तर मी अजित पवार यांचा आशीर्वाद नक्कीच घेईल. वैचारिक मतभेद असू शकतात परंतू वैयक्तिक टीका नसावी अशी पवार साहेबांची शिकवण असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले. यावेळी युगेंद्र पवार यांनी असेही म्हटले की, बारामतीमध्ये पूर्वी दबदबा असायचा परंतु आता गुन्हेगारी वाढली आहे. तर शरद पवार साहेबांच्या विचारांचा आमदार आल्यास गुन्हेगारी कमी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Published on: Sep 09, 2024 06:07 PM