Rohit Pawar : ‘ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा पाच गाड्या…’, रोहित पवारांचा घणाघात
पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 कोटी रुपयांची रोख रक्कम एका खासगी गाडीतून ताब्यात घेतली. या खासगी वाहनाचे सांगोला कनेक्शन समोर आल्यानंतर विरोधकांनी शहाजीबापू यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुण्यातील खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका खासगी वाहनात 5 कोटी पकडण्यात आले. रात्री घडलेल्या या घडामोडींमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकऱणावरून संजय राऊत यांनी शहाजी बापू यांच्यावर निशाणा साधल्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. जप्त करण्यात ५ कोटी रूपये हे शहाजीबापू पाटील यांचे आहेत, अशी चर्चा आहे. पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूरच्या डोंगर-झाडांमध्ये पोलिसांना हे पैसे सापडले. एकच गाडी सापडली अशा पाच गाड्या होत्या. अंदाजे २५ ते ३० कोटी रूपये होते, असं वक्तव्य करत रोहित पवार यांनी या प्रकरणावरून हल्लाबोल केलाय. पुढे ते असेही म्हणाले, लोकसभा निवडणुकीत पाण्यासारखा पैसा वाटला. एकेक मतदारसंघात महायुतीच्या नेत्याने १००-१५० कोटी रूपये वाटले आणि आता विधानसभा निवडणुकीला जे महायुतीचे आमदार आहेत. भाजप, शिंदेंच्या शिवसेनेचे किंवा अजित दादांचे आमदार असुद्यात कमीत कमी ५० कोटी रूपये खर्च केला जाईल अशी चर्चा असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.