Rohit Pawar On Ajit Pawar : अजितदादांवर भाजपकडून दबाव, रोहित पवारांचा मोठा दावा काय?

| Updated on: Jun 09, 2024 | 3:20 PM

अजित पवार यांचे १२ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला आहे. बीडमधील एक आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. यासह पुढील एका महिन्यात महाराष्ट्रात मोठा बदल झालेला दिसेल, असे काही सूचक संकतेही रोहित पवारांनी दिल्याचे पाहायला मिळाले

Follow us on

अजित पवार यांच्यावर कमळावर निवडणूक लढण्यासाठी भाजपकडून दबाव होता, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दावा केला आहे. तर अजित पवार यांचे १२ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला आहे. बीडमधील एक आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. यासह पुढील एका महिन्यात महाराष्ट्रात मोठा बदल झालेला दिसेल, असे काही सूचक संकतेही रोहित पवारांनी दिल्याचे पाहायला मिळाले. ‘जे नेते साहेबांना सोडून गेले त्यांना व्यक्तिगत खूप काही मिळालं आहे. प्रफुल पटेल यांना व्यक्तिगत गिफ्ट दिलंय, ईडीने त्यांची प्रॉपर्टी सोडवली जी अटॅच्ड केली होती. त्यामुळं मंत्रिपद मिळालं नाही तरी व्यक्तिगत गिफ्ट मिळाले आहे’, असे वक्तव्य करत रोहित पवारांनी खोचक टोला लगावला आहे. आता जे साहेबांना सोडून गेले आता त्यांना विधानसभा निवडणुकीत एकच पर्याय असेल ते म्हणजे राष्ट्रवादी ऐवजी भाजपच्या चिन्हवर त्यांना लढावं लागेल, असेही रोहित पवार म्हणाले.