‘मला कॅपी करायला सल्लागार नेमला, पण माझं वय कसं कॉपी करणार?’, रोहित पवारांचा कोणाला टोला?
राम शिंदे यांनी २० लाख रूपये देवून सल्लागार नेमल्याचे रोहित पवार म्हणाले. मला कॅपी करण्यासाठी राम शिंदेंनी सल्लागार नेमला असल्याचेही रोहित पवारांनी म्हटलं. माझं वय कसं कॉपी करणार, असा टोलाही राम शिंदेंना लगावला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात राहणीमानावरून चांगलीच जुंपली आहे. राम शिंदे यांच्या राहणीमानावरून रोहित पवारांनी टीका केली होती, यावर राम शिंदे यांनी रोहित पवारांना उत्तर देत टोला लगावला आहे. मुंबईला गेल्यानंतर माणूस गोरा कसा होतो हे मला माहिती नाही आता तर कहरच झालाय माझं वय 38 मी तर युवाच आहे. मात्र त्यांनी वीस लाख रुपये देऊन कन्सल्टंट घेतलं असं मला कळालं आणि कन्सल्टनला काय सांगितलं तर रोहित पवरांना कॉफी करायचं….पण माझं वय तर कॉपी करता येणार नाही, असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. माझी पांढरे केस आमदार झाल्यानंतर समाजकारणात काम करत असताना झाले, काळे केस मी करत नाही कारण मला लपवा लपवी जमत नाही, असा टोला त्यांनी लगावलाय. तर मतदारसंघातील सर्व प्रश्न त्यांना समजून चुकले आहे आता थेट माझ्या लुकवर आले आहे. मी ग्रामीण भागातील खेडुक माणूस आहे. मी पॅन्ट शर्ट घालत आहे त्यांनी माझ्या लुकवर बोलायला सुरुवात केली, याचा अर्थ समजून घ्या त्यांना इथले कोणतेही प्रश्न शिल्लक राहिले नाही, असं राम शिंदे यांनी म्हटलं आहे तर त्यामुळे माझ्या लुकवर बोलण्यापेक्षा त्यांनी मतदारसंघात पाच वर्ष काय काम केलं हे जनतेला सांगावं असा सवाल राम शिंदे यांनी रोहित पवारांना केला आहे