जेष्ठ म्हणून आदर पण गांधीवादाचा मुखवटा लावून…, रोहित पवारांचं अण्णा हजारेंना प्रत्युत्तर

| Updated on: May 23, 2024 | 2:05 PM

शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अण्ण हजारेंना लक्ष्य केलं होते. त्यावर अण्णा हजारे म्हणाले, शरद पवार यांना १०-१२ वर्षांनी जाग आली आहे. असे अण्णा हजारेंनी म्हटले होते. तर अण्णा हजारेंनी पवारांवर केलेल्या टीकेवर बोलताना रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर गांधीवादाचा मुखवटा लावून भावनांशी खेळणे योग्य नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब झाले, असं वक्तव्य करत रोहित पवार यांनी अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अण्णा हजारेंनी पवारांवर केलेल्या टीकेवर बोलताना रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर गांधीवादाचा मुखवटा लावून भावनांशी खेळणे योग्य नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी पुढे असेही म्हटले, ‘२०१४ पूर्वी प्रत्येक विषयावर आंदोलन करणारे, प्रतिक्रिया देणारे तथाकथित स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर मात्र एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना शांतच राहिले नाहीतर गायब झालेत.’ शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अण्ण हजारेंना लक्ष्य केलं होते. त्यावर अण्णा हजारे म्हणाले, शरद पवार यांना १०-१२ वर्षांनी जाग आली आहे. त्यांना अचानक जाग कशी आली मला माहिती नाही. त्यावेळी मी केलेल्या आंदोलनामुळे शरद पवार यांचे अनेक मंत्री घरी गेले होते, कदाचित त्याचा राग त्यांना असावा. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली, असं प्रत्युत्तर अण्णा हजारे यांनी दिलं होतं.

Published on: May 23, 2024 02:05 PM
पुणे अपघात प्रकरणावर वसंत मोरे म्हणाले, आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते कारण…
चूक केली… पुणे कार अपघातप्रकरणी विशाल अग्रवालची आपल्या मुलाबद्दल पोलिसांसमोर कबुली