Amol Kolhe : ‘मविआ’त धुसफूस? ‘ठाकरे गट झोपेत अन् काँग्रेसची मोडलेली पाठ…’, अमोल कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ

| Updated on: Jan 10, 2025 | 3:09 PM

नाना पटोले आणि संजय राऊत यांचं थेट नाव घेत विजय वडेट्टीवार यांनी आपल्याच सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केला. त्यानंतर आता खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

महाविकास आघाडीतील धुसफूस आता चव्हाट्यावर येण्यास सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीन समन्वयाचा अभाव असल्याने शरद पवार मविआत नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. तर दुसरीकडे जागावाटपाच्या घोळामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसला असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. इतकंच नाहीतर नाना पटोले आणि संजय राऊत यांचं थेट नाव घेत विजय वडेट्टीवार यांनी आपल्याच सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केला. त्यानंतर आता खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील परिस्थितीवर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, ‘आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत. आता आपल्याला लढायला संधी आहे. सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे, त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे..’, असं अमोल कोल्हे म्हणाले.

Published on: Jan 10, 2025 03:09 PM
Vijay Wadettiwar : पटोले अन् राऊतांचं नाव घेत वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, ‘मविआ’ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
‘EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’, हिंदूत्वावर भाष्य करताना भाजपचा बडा नेता काय म्हणाला?