अन् खासदार अमोल कोल्हे थक्क, चिमुकल्यानं कानात सांगितले, ‘पवार साहेबांची…’
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे साताऱ्यातील एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांच्या कानात एका चिमुकल्यानं नेमकं काय सांगितलं, जे ऐकताच अमोल कोल्हे झाले थक्क, बघा व्हिडीओ
सातारा, ३ ऑक्टोबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आज साताऱ्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. साताऱ्यातील एका कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरू असताना पारितोषिक वितरण समारंभादरम्यान हर्षवर्धन पाटील असे नाव असणाऱ्या चिमुकल्याने त्याचे पारितोषिक स्वीकारल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांच्या कानात त्याने “पवार साहेबांची साथ सोडू नका”, असे सांगितले. यानंतर खासदार अमोल कोल्हे हे ऐकून थक्क झाले. यावेळी हर्षवर्धन पाटील या चिमुकल्याचे त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमातील भाषणात हर्षवर्धन या छोट्या चिमुकल्याने सांगितलेल्या वाक्याचा आवर्जून उल्लेख करत चिमुकल्याच्या बोलण्यातून त्याच्या घरातील राजकीय सजगता दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले.
Published on: Oct 03, 2023 04:22 PM