धनंजय मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि…, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप काय?

| Updated on: Jul 22, 2024 | 2:23 PM

शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी हा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले.... आम्ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा मेणाचा पुतळा बनवणार होतो. जेव्हा ही गोष्ट धनंजय मुंडे यांना कळली त्यांनी मला घरी बोलावून दम दिला. इतकंच नाहीत नितीन देशमुख यांनी धनंजय मुंडे यांना काय दिलं आव्हान?

गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बवनू नको, असं धनंजय मुंडे बोलले होते. शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी हा आरोप केला आहे. इतकंच नाहीतर मला धनंजय मुंडे यांनी घरी बोलावलं आणि दम दिला असल्याचेही नितीन देशमुख म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, ‘लोणावळ्यात वॅक्स म्युझियम आम्ही तयार केलं होतं. त्या वॅक्स म्युझियम मध्ये आम्ही शरद पवार, लता मंगेशकर यांचे पुतळे बनवले होते आणि त्या वॅक्स म्युझियममध्ये आम्ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा देखील पुतळा बनवणार होतो. जेव्हा ही गोष्ट धनंजय मुंडे यांना कळली त्यांनी मला घरी बोलावून दम दिला. स्वतःच्या सख्ख्या काकाबद्दल यांच्या मनात काय विचार आहेत ते बघा आणि मी जर काहीही बोलत असेल तर यावर धनंजय मुंडे यांनी बोलावं आणि यात तथ्य आहे की नाही हे कळू द्या’, असं वक्तव्य नितीश देशमुख यांनी करत धनंजय मुंडे यांना आव्हानच दिलंय.

Published on: Jul 22, 2024 02:23 PM
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’वरून आदिती तटकरेंचं विरोधकांना थेट प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची तयारी नसून…
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन् मुस्लिम..; मनसे नेत्याची खोचक टीका