राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी शरद पवार गटाचा नवा प्लान, साहेब की दादा आता NCP चे कार्यकर्तेच ठरवणार

| Updated on: Aug 16, 2023 | 3:56 PM

VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनंतर जास्तीत जास्त नव्या सदस्यांची नोंदणी करून घेण्यासाठी 'मी शरद मित्र' नवं अभियान सुरू, ५ लाख नवे सदस्य जोडण्याचा शरद पवार गटाचा निर्धार

पुणे, १६ ऑगस्ट २०२३ | अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून शिवसेना आणि भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यामुळे काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नक्की कोणाचा आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या शहरांमध्ये नक्की कार्यकर्ते कुणाच्या बाजूने उभे राहणार याकरता दोन्ही नेत्यांकडून जोरदार नियोजन सुरू आहे. अशातच पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात शरद पवार गटाने नवा प्लान केल्याचे समोर आले आहे. पुणे शहरात शरद पवार यांच्यासोबत आपण आहोत हे दाखवण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघात मी शरद मित्र या नावाखाली सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे. मी शरद मित्र नावाने सदस्य नोंदणी केली जाणार आहे. पुण्यातील कोथरूड या भागातून सदस्य नोंदणीचा शुभारंभ झाला आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप याच्या हस्ते या अभिनयानाचं उदघाटन झाले असून जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं हे अभियान असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरात जवळपास १०० चौकात हे अभियान राबवणार आहे तर ५ लाख नवे सदस्य जोडण्याचा पवार गटाचा निर्धार याद्वारे असणार आहे.

Published on: Aug 16, 2023 03:46 PM
मटणापेक्षाही मशरूम महाग! मशरूम विक्रीतून विक्रेत्यांला ‘अच्छे दिन’, किती मिळतोय मशरूमला भाव?
Raj Thackeray : मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेच खडे; चांद्रयानावरून राज ठाकरे यांचे सरकारला चिमटे