शरद पवार यांचं केंद्रीय पशुसंवर्धन मंत्र्यांना पत्र, पत्रातून म्हणाले…

| Updated on: Apr 06, 2023 | 4:44 PM

VIDEO | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्र्यांना पत्र, पत्र पाठवण्यामागचं कारण नेमकं काय?

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्र्यांना एक पत्र पाठवले आहे. या पाठवलेल्या पत्रात शरद पवार यांनी दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर आक्षेप नोंदवला आहे. तसेच यामध्ये त्यांनी दुग्धजन्य पदार्थांची आयात न करण्याची विनंतीही केली आहे. या आयातीमुळे स्थानिक उत्पादनांना फटका बसत असल्याचं मतही शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, दुग्धविकास विभागाकडून एक योजना आखण्यात येत आहे. या योजनेमार्फत परदेशातून दुग्धजन्य पदार्थ आयात करण्यात येणार आहे. ही बातमी कळताच शरद पवार यांनी तातडीने केंद्राला हे पत्र पाठवले आहे. दरम्यान गेल्या वर्षात कोरोना महामारीमुळे दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांवर मोठा परिणाम झाला होता. जर अशी आयात सुरू झाली तर पुन्हा या व्यवसायिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Published on: Apr 06, 2023 04:44 PM
बजरंगबली की जय! रिमोटंनं चढवला तब्बल 350 किलोचा हार, किंमत ऐकून व्हाल थक्क
बुलेट चालवत गिरीश महाजन सावरकर गौरव यात्रेत सहभागी, बघा व्हिडीओ