दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीत शरद पवार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘मी भाजपसोबत…’
VIDEO | दिल्लीत पुण्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत शरद पवार नेमकं काय म्हणाले? दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी ही महत्वाची बैठक पार पडली
नवीदिल्ली, ८ ऑगस्ट २०२३ | सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड पुकारून आपला वेगळा गट निर्माण केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. हा गट सत्तेत सहभागी झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या परिस्थितीवर शरद पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. “मी कधीच तडजोड करणार नाही. मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका. आपण भाजपबरोबर जाणार नाही. आगामी निवडणूकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करा आपला विचार लोकांपर्यंत घेऊन जा” असा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला. मनात संभ्रम न ठेवता काम करा, असं आवाहनदेखील शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलं. तर सोमवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही महत्वाची बैठक पार पडली आणि आज दिल्लीतच भाजपा प्रणीत NDA ची महत्वाची बैठक होणार आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र आणि गोव्याच्या 48 खासदारांशी संवाद साधणार आहेत.