Sharad Pawar : अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्…, बघा व्हिडीओ

| Updated on: Nov 15, 2024 | 12:25 PM

अजित पवारांनी केलेल्या या टीकेवर शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल करत त्यांच्यावर पलटवार केल्याचे पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या वेगवेगळ्या मतदारसंघात जाहीर सभा होतायंत

गेल्या काही दिवसांपूर्वी एका प्रचारसभेतून अजित पवार यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांच्या विरोधात बोलत असताना दमच भरल्याचे पहायला मिळाले होते. कारखाना कसा चालू होतो ते बघतो. आणि तू आमदार कसा होतो तेच बघतो, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. दरम्यान, अजित पवारांनी केलेल्या या टीकेवर शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल करत त्यांच्यावर पलटवार केल्याचे पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या वेगवेगळ्या मतदारसंघात जाहीर सभा होतायत. शिरुर विधानसभा मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत बोलताना शरद पवारांनी अजित पवार यांची पुन्हा एकदा नक्कल केली. इतकंच नाहीतर त्यांच्यावर जोरदार टीकाही केली. ‘शिरुर तालुक्यात साखर कारखाने झालेत. त्यामुळे लोकांच्या हाताला काम मिळत आहे. ज्या पद्धतीने काम केलं आणि आताही करत आहेत. आम्हा लोकांची त्यांच्याबाबत कोणतीही अडचण नाही. शिरुर तालुक्याची चिंता करायची नाही. येथील लोकांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही’, असं म्हणत शरद पवार यांनी आमदार अशोक पवार यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

Published on: Nov 15, 2024 12:25 PM
रामटेकमध्ये काँग्रेसचा सांगली पॅटर्न, वाद पेटला; ‘सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..’, भास्कर जाधवांची जिव्हारी लागणारी टीका
Sushma Andhare : ‘पंकजा मुंडे 12 वर्ष वनवासात होत्या अन् बऱ्याच गोष्टी त्यांना इच्छेविरुद्ध…’, सुषमा अंधारे यांचा टोला