लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांनी केलेल्या मिमिक्रीला काल शरद पवारांनी मिमिक्री करतच उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. बारामतीला भावूक केलं जाईल म्हणून अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार गटावर टीका केली होती. तोच धागा पकडत शरद पवारांनी चक्क अजित पवारांची नक्कल केली. जनतेला भावनिक केलं जाईल, असं म्हणत अजित पवारांनी बारामतीकरांना सतर्क केलं होतं. त्यावेळी अजित पवारांनी भरसभेतील मंचावरून रोहित पवार भावूक झाल्याची नक्कल केली होती. मात्र काल स्वतः अजित पवारच भावनिक झालेत. त्यामुळे अजित पवार यांनी पुतणा रोहित पवार यांच्या केलेल्या नकलेची अजित पवारांचे काका शरद पवार यांनी मिमिक्री करून परतफेड केली. बारामती विधानसभेचा अर्ज भरल्यानंतर अजित पवार काल काहिसे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. ‘लोकांना घर फुटलेलं आवडत नाही, म्हणून लोकसभेला घरातील उमेदवार द्यायला नको होतो’, अशी कबुली देणाऱ्या अजित पवारांनी शरद पवारांवरच आपलं घर फोडण्याचा आरोप केला. यावेळी बोलताना अजित पवार भावूक झाले होते. यालाच शरद पवारांनी नक्कल करत प्रत्युत्तर दिलं. बघा स्पेशल रिपोर्ट