Sharad Pawar : इचलकरंजीत 2019 च्या सभेची पुनरावृत्ती, वयवर्ष 84 अन् भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा गाजली

| Updated on: Nov 15, 2024 | 5:25 PM

विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रचार अंतिम टप्प्यात आहे. आज शरद पवार हे इंचलकरंजीत येथे होते. त्यांची इंचलकरंजीत सभा पार पडली. या सभेतही पावसाने हजेरी लावली. मात्र शरद पवार थांबले नाहीत.

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २०१९ साली सातारा येथे शरद पवार यांची एक जाहीर सभा झाली होती. जी सभा आजही सगळ्यांच्या स्मरणात आणि चर्चेत आहे. सातारा येथे शरद पवार यांचं भाषण सुरू असतानाच मुसळधार पाऊस पडला होता. यावेळी मात्र शरद पवार यांनी आपलं भाषण भरपावसातही थांबवलं नाही. समोर उपस्थित असणाऱ्या लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन संपूर्ण भाषण ऐकलं. या सभेची संपूर्ण देशभरात चर्चा झाली. त्यावेळी भाजपचे उमदेवार उदयनराजे भोसले यांचा दारूण पराभव झाला होता. दरम्यान, आज इचलकरंजीत २०१९ च्या याच सभेची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांचा धडाका सुरू असताना विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रचार अंतिम टप्प्यात आहे. आज शरद पवार हे इंचलकरंजीत येथे होते. त्यांची इंचलकरंजीत सभा पार पडली. या सभेतही पावसाने हजेरी लावली. मात्र शरद पवार थांबले नाहीत. तर त्यांनी भर पावसात आपलं भाषण केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये आज काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली. महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यासाठी शरद पवार हे इचलकरंजीमध्ये होते.

Published on: Nov 15, 2024 05:25 PM
uddhav thackeray : ‘एकदा या गद्दाराला पाडा…’, सिल्लोडच्या प्रचारसभेतून उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
Sharad Pawar : ‘लाडकी बहीण’चा महायुतीला फायदा होणार? शरद पवार म्हणाले, ‘नाव गोंडस दिलं पण…’