Jayant Patil : ‘सेन्सॉर बोर्डात विद्वान लोकं, त्यांची मानसिकता…’, फुले चित्रपटावर घेतलेल्या आक्षेपावरून जयंत पाटलांचा खोचक टोला
फुले चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाकडून आक्षेप घेतला गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट देखील केले आहे
गेल्या काही दिवसांपासून या ना त्या निमित्ताने सेन्सॉर बोर्ड वादाच्या भोवऱ्यात सापडत असल्याचे दिसतंय. फुले चित्रपटाच्या निमित्ताने सेन्सॉर बोर्ड पुन्हा वादाच्या कचाट्यात सापडले आहे. फुले चित्रपटावर काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर फुले चित्रपटातील काही दृश्यांबाबत सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सेन्सॉर बोर्डाला टोला लगावला आहे.
‘फुले’ चित्रपटावर आक्षेप घेतले जात आहे त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते, असे म्हणत जयंतराव पाटील यांनी सेन्सॉर बोर्डावर ही टीका केली आहे. यासंदर्भात ट्वीट करत जयंत पाटील म्हणाले, काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स सारख्या Propoganda Based फिल्म्सवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही मात्र ‘फुले‘ सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. तर Who is Namdeo Dhasal? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोक बसतात याची कल्पना आली होती. पण आता फुले चित्रपटावर आक्षेप घेतले जात आहे त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते, अशी टीकाही त्यांनी सेन्सॉर बोर्डावर केली आहे.