शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?

| Updated on: Dec 06, 2023 | 3:29 PM

शरद पवार यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांनी जगदीप धनखड यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन आज सदिच्छा भेट घेतली. तर शरद पवार आणि जगदीप धनखड यांच्या या भेटीमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली?

नवी दिल्ली, ६ डिसेंबर २०२३ : शरद पवार यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांनी जगदीप धनखड यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन आज सदिच्छा भेट घेतली. तर शरद पवार आणि जगदीप धनखड यांच्या या भेटीमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आली नसून त्यांच्यात कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंट हँडलवर जगदीप धनखड यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहे. शरद पवार यांनी जगदीप धनखड यांच्या निवासस्थानातील फोटो शेअर करत ही सदिच्छा भेट असल्याचे म्हणाले आहे. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर जी यांना नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट दिली असं कॅप्शनही शरद पवार यांनी दिले आहे. शरद पवार यांनी या भेटीचे फोटो शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Dec 06, 2023 03:29 PM
‘त्या’ मंत्री, अधिकाऱ्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती, काय लिहिलं पत्र?
… उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?