‘कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या…’, शरद पवार अन् अजितदादा एकाच बॅनरवर, कुठं होतेय बॅनरची चर्चा?

| Updated on: Aug 16, 2023 | 6:51 PM

VIDEO | शरद पवार यांच्या बीडच्या सभेपूर्वी कुठं झळकले शरद पवार आणि अजित पवार यांचे एकत्रित फोटो असणारे बॅनर?

बीड, १६ ऑगस्ट २०२३ | उद्या बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पहिलीच जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने शहरात लावलेल्या बॅनर्सकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी अजित पवार यांच्या समर्थनात आशीर्वाद द्या अशा आशयाचे बॅनर्स शहरभरात लावले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात समझोता घडवून आणण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, अजित पवार यांनी घेतलेली भेट या पार्श्वभूमीवर शरद पवार उद्या सभेत काय बोलतात का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र या सभेपूर्वीच बीडमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे एकत्रित फोटो असेलेल बॅनर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. “साहेब बीडमध्ये आपले हार्दिक स्वागत… कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या… आपला माणूस कामाचा माणूस… आम्ही बीडकर दादांसोबत” अशा आशयाचे बीडमध्ये बॅनर लागले आहेत.

Published on: Aug 16, 2023 06:44 PM
‘… हा तर मोठा जोक!’, विजय वडेट्टीवार यांच्या शरद पवार यांच्यावरील ‘त्या’ टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्याचं प्रत्युत्तर
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर ‘मनसे’कडून मुंबई-गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या ‘त्या’ कंपनीची तोडफोड