Parbhani Violence : ‘माझ्या मुलाचा मर्डर केला अन्…’, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या शरद पवारांसमोरच संताप

| Updated on: Dec 22, 2024 | 11:04 AM

परभणीमध्ये संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेविरोधात निषेध म्हणून ११ डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली होती. त्या बंदला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि काहींना अटक केली. यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची शरद पवार यांनी भेट घेतली. श्वसनाच्या त्रासाने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मात्र माझ्या मुलाला कोणताही त्रास नव्हता, पोलिसांनीच माझ्या मुलाचा खून केल्याचा आरोप सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने केलाय. ‘माझ्या मुलाचं खून झालाय, पोलिसांच्या मारहाणीत माझ्या मुलाचा जीव गेला’, असे सांगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने आरोप करत शरद पवारांसमोर संताप व्यक्त केला आहे. परभणीमध्ये संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेविरोधात निषेध म्हणून ११ डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली होती. त्या बंदला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि काहींना अटक केली. ज्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा समावेश होता. मात्र कोठडीत सोमनाथ यांचा मृत्यू झाला. तर पोलिसांकडून करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत त्यांचा मृत्यू झालाचा आरोप सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. त्यानंतर शरद पवार यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भेटीनंतर काय म्हणाले शरद पवार?

Published on: Dec 22, 2024 11:04 AM